अमळनेर: तालुक्यातील शिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती चेअरमन पुष्पलता अशोक पाटील होते. शालेय साहित्यात सहा वह्या, पेन, पट्टी पेन्सिल कोण मापक, गुण्या व इतर साहित्य होते. यावेळी शालेय समिती सदस्य डी ए धनगर सर व
ग्रामपंचायत सदस्य यशवंत बैसाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याची मोठी मदत होईल व सर्व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपले शैक्षणिक जीवन समृद्ध करू शकतील, आपल्या दातृत्वाने शालेय विद्यार्थ्यांचे जीवन व शिक्षण सुखकर होण्यासाठी मदत होईल असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. तसेच एकल पालक असलेल्या विद्यार्थिनीला शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल माजी सरपंच बाबुराव महाजन यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच गोविंदा सोनवणे ,विकास सोसायटी चेअरमन मीराबाई पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन,शालेय समिती सदस्य काळू नाना पाटील, वसंतराव भगवान पाटील,पोपट बारकु पाटील, विजय बोरसे, मुख्याध्यापक अनिल पाटील, उपसरपंच कल्याणी पाटील,चंद्रभागा पाटील , भूषण सोनवणे, किशोर पाटील, हेमंत सोनवणे,अंकित सोनवणे उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामविकास शिक्षण संस्था मुडीचे चेअरमन उदय नारायण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शालेय वर्षाची सुरुवात करण्यात आली. विजय बोरसे यांनी देखील वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-
श्रीमती.योगिता देशमुख मॅडम
आभार – मुख्याध्यापक अनिल पाटील सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.