त्या दोघींचे शव मंगळवार पर्यंत आणण्याचे प्रयत्न- मंत्री अनिल पाटील

रशियाच्या नदीत वाहून गेलेल्या अमळनेर येथील जिशान आणि जिया या दोन्ही विद्यार्थ्यांचे शव मंगळवार पर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू

मंत्री अनिल पाटील

अमळनेर:  रशियाच्या नदीत वाहून गेलेल्या अमळनेर येथील जिशान आणि जिया या दोन्ही विद्यार्थ्यांचे शव सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर म्हणजे दुबई मार्गे विमानाने मंगळवार पर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी अमळनेर येथे येताच पिंजारी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की आपला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून चार दिवसांपासून भारतीय राजदूतांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.प्रामुख्याने नागरी उड्डाण मंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल यांचेसह राज्याचे चीफ सेक्रेटरी यांची चांगली मदत झाली,मृतदेह हाती लागल्यावर शवविच्छेदन झाले असून कोर्टाच्या परवानगी नंतर दोघांचे मृतदेह प्रफुल्ल पटेल यांच्याच मदतीने कार्गो च्या साहाय्याने इंडियन एम्बेसरी च्या माध्यमातून मृतदेह जास्तीतजास्त मंगळवार पर्यंत भारतात तथा मुंबई पर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पिंजारी कुटुंबीय आपले निकटवर्तीय असून घटनेचे वृत्त कळताच शासकीय पातळीवर मी प्रयत्न सुरू केला होता,घटनेपासूनच जिल्हाधिकारी तसेच चिफ सेक्रेटरी, प्रफुल्ल पटेल व आपल्यात कोरडीनेशन चांगले झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]