कविता सुर्वे यांना अमळनेरच्या गटशिक्षणाधिकारी पदी पदभार

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा काढला पदभार

अमळनेर: येथील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा पदभार काढला , गेल्या आठवडाभरात खंडणी व शाळेची बदनामी प्रकरणात दोन गुन्हे दाखल असलेले अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढला असून त्यांच्या जागी कविता सुर्वे यांना पदभार देण्यात आलेला आहे, शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी यांचा तातडीने काढलेला पदभार यामागील मुख्य कारण खंडणी व बदनामी कारक गुन्ह्यातील प्रकरणात शासकीय कार्यालयात शासकीय वेळेत घेतलेली पत्रकार परिषद तसेच तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रावसाहेब पाटील यांच्या निलंबनाची केलेली मागणी ,तक्रारदार यांनी दिनांक 06/06/2024 रोजी जिल्हा परिषद जळगाव कार्यालय समोर केलेले उपोषण अशी विविध कारणे असल्याचे बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]