अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 27/ 5/ 2024 रोजी च्या आदेशान्वये जिल्हा परिषद शाळेत काम करणारे शिक्षक, रवींद्र जिभाऊ पाटील, जितेंद्र दामोदर महाजन, योगेश भगवान पाटील, प्रफुल्ल यशवंत पाटील, भगवान गुलाबराव देसले, यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले सदर आदेशाला व्यतित होऊन सदर शिक्षकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात एडवोकेट योगेश एम पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल केली शिक्षकांच्या सेवा समाप्तीच्या आदेशाबाबत उन्हाळी सुट्टीच्या विशेष न्यायालयाने तातडीची सुनावणी घ्यावी याबाबतची विनंती एडवोकेट पाटील यांनी न्यायालयास केली शिक्षकांच्या हिताचा विचार करून मा न्यायालयाने सदर प्रकरणाची तातडीने सुनावणी घेतली केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्राथमिक स्तरावरील शिक्षकांचे समायोजन काही वर्षापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये झालेले होते सदर शिक्षकांचे समायोजन करताना त्यांचे नाव हे शासनाने दिलेल्या समायोजनाच्या शिक्षकांच्या मूळ यादीत नव्हते असा एस आय टी चा अहवाल आहे या कारणांमुळे शिक्षकांना सेवा समाप्तीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिला याबाबत महत्वपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालयाने शिक्षकांच्या सेवा समाप्तीच्या आदेशाला स्थगितीचे महत्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिले तसेच माननीय न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव ग्रामविकास विभागाचे सचिव शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण उपसंचालक नाशिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यासह त्या त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना नोटीसा देखील काढल्या याचिका करते शिक्षक यांच्या वतीने एडवोकेट योगेश एम पाटील यांनी युक्तिवाद केला तर शासनाच्या वतीने एडवोकेट प्रमोद पाटील यांनी शासनाची भूमिका मांडली