अमळनेर : शाळेची बदनामी करून तसेच लाच मागितली. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या विरूद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी जवखेडे सिम येथील श्री दत्त गुरु इग्लीश मेडीयम जवखेडे येथे सुमारे एक महीन्यापासुन लिपीक या पदावर नेमणुकीस आहे. 18/04/2024 रोजी 09. 44 वाजता रावसाहेब मांगो पाटील यांनी एका व्हाँट्सअॅप ग्रुपवर आमचे शाळेबददल बदनामी कारक मजकुर टाकला होता. याबाबत मी पंचायत समितीकडे 27/05/2024 रोजी अर्ज केलेला होता. त्याची नक्कल घेण्यासाठी 28/05/2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मी तसेच रवींद्र सुकलाल पाटील, गोकुळ धोंडू पाटील असे पंचायत समिती अमळनेर येथे आवक जावक विभागात नकला घेण्यासाठी गेलो होतो. तेथुन जात असतांना आम्हाला रावसाहेब मांगो पाटील हे त्यांचे दालनात बसलेले आम्हांला दिसले होते. आवक जावक विभागातून काम आटोपुन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांचे दालनात गेलो. तेथे त्यांना विनंती केली की, तुम्ही आमचे शाळेची बदनामी करु नका. तेव्हा रावसाहेब पाटील हे मोठ मोठ्याने बोलले की, आइ घाल्या तुला व तुझ्या ट्रस्टमधील लोकांना माहीती आहे मी कसा आहे. मला आडवा जावू नका. मला आडवे गेल्यास मी तुमचे बोटी बोटी करुन टाकीन. 2012 पासुन तुमच्या शाळेला जे शासकीय अनुदान मिळाले आहे. त्याचेवर मला 5 रुपये टक्क्याचे दराने पैसे आणुन दयावे. तसेच तसेच मला आरटीईवर वर 5 रु टक्के दराने मला पैसे आणुन द्याावे. माझेकडेस नेहमी माणसे तयार असतात. मला कोणालाही मोबादला देण्याची गरज नाही. मी फक्त पैशांची भाषा समजतो. मला जर संध्याकाळ पर्यंत जर पैसे न आल्यास मी तुमच्या शाळेचे मान्यता रद़द करुन टाकेन. तुम्हाला कोणाला जावुन सांगायचे आहे ते सांगा असे बोलले. त्यानंतर मी त्यांना बोललो की, तुम्ही आणि आमचे शाळेचे लोक काय बघा मला तुमच्या भांडणात पडायचे नाही. तेव्हा रावसाहेब पाटील बोलले की, तु माझे पर्यंत जसा निरोप घेवुन आला आहे तसा तु त्यांचे पर्यंत माझा निरोप पोचव असे बोलले. त्यानंतर आम्ही तेथुन निघुन गेलो होतो. जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून मी खूप घाबलो होतो, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्यावर कलम 384, 294 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.