साने गुरुजी कन्या हायस्कूल व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  केले दैदित्यमान यश संपादन

शालांत परीक्षा इ. 10 वी.मध्ये अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय आणि साने गुरुजी कन्या हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी संपादन केले दैदित्यमान यश.

अमळनेर :साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर या विद्यालयाचा 98.14% आणि साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर चा 99.26 % टक्के निकाल लागला असून यामध्ये अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ,साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 चा निकाल नुकताच घोषित झाला त्यात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे 216 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल 98.14% एवढा लागला 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थ्यांनी आले आहेत. यात चोरडिया विनय जीवन हा 97% गुण मिळवून शाळेतून प्रथम आला तर वेदांत भरत पाटील 94.60% गुण मिळून शाळेतून द्वितीय आला .पार्थ बाळू पाटील 94.20 % गुण मिळवून शाळेतून तृतीय आला आहे. 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थी आले. त्याचबरोबर साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर इयत्ता दहावीचा निकाल 99.29 टक्के लागला असून 90% पेक्षा जास्त गुण मिळवून 12 विद्यार्थीनी तर विशेष प्राविण्यात 71 विद्यार्थिनी व उर्वरित सर्व विद्यार्थिनी प्रथम वर्गात यशस्वी झाल्या .एकूण 141 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या .शाळेतून प्रथम- महाजन उत्कर्षा हरी 96.80% द्वितीय- कापडणीस प्रतीक्षा धनंजय 95.60% तृतीय- सामरे नेहा लालचंद 94.45% चतुर्थ -धारिणी उल्केश पाटील 93% पाचवी -कुसुंबे प्रांजल वसंत 92.60 % अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी दैदित्यमान यश संपादन केले असून संस्थेच्या वतीने सचिव दादासो. संदीप घोरपडे सर आणि संस्थेचे अध्यक्ष आबासो. हेमकांत पाटील, मुख्खाध्यापक,शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यी, विद्यार्थीनींना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.यात पालक वर्ग व शैक्षणिक श्रेत्रातील जाणकारांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]