अमळनेर: स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजवावे त्यांचा सर्वांगीण विकास करावा त्यातून आदर्श नागरिक घडेल असे प्रतिपादन मंगळ ग्रह सेवा संस्था अंमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले.
येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित दोन दिवशी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी डॉ.डिगंबर महाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. डॉ. महाले पुढे म्हणाले की पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाने सुरू केलेले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही एक आदर्श चळवळ आहे मंगळ ग्रह सेवा संस्थान सर्वतोपरी मदत या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी करेल, भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षा केंद्रांमधून आदर्श नागरिक घडले पाहिजेत सध्या स्पर्धा परीक्षा अभ्यासासोबत मूल्यांची रुजवणूक करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज निस्वार्थ काम करणाऱ्यांची वाणवा आहे आज योग्य नागरिक घडत नाही ही समस्या आहे आई वडीलांची मान अभिमानाने उंच होईल अशी पिढी निर्माण झाली पाहिजे.
याप्रसंगी अंमळनेरचे डीवायएसपी सुनील नंदवाडकर,प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी, एम एम कॉलेज पाचोरा येथील प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी, साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. डीवायएसपी नंदवाडकर म्हणाले की अभ्यासात सातत्य व मेहनत करण्याची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षातून यश निश्चित मिळते. संयम देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा जीव ओतून काम करा असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. एस आर चौधरी व डॉ. अतुल सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेहल सिसोदे, आदित्य पाटील, गायत्री पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
दोन दिवशी कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, निवृत्त शिक्षक व्ही एन ब्राह्मणकर,श्रम साफल्य अभ्यासिका वेल्हाणेचे संचालक के एल पाटील, कळमसरे हायस्कूलचे उपशिक्षक सोपान भवरे ,तलाठी एम आर पाटील, पोलीस चंदन पाटील, विशाल सोनवणे, दानेश सोनार, मयूर पाटील, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
लोकमान्य टिळक स्मारक समिती,पंकज कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र भावसार, निवृत्त लिपिक रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक राजू दादा फाफोरेकर,शिक्षक सतीश कांगणे, जाधव इंग्लिश अकॅडमी चे संचालक विनोद जाधव, शिक्षक प्रवीण पाटील, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, शशिकांत पवार, आयटीआय इन्स्ट्रक्टर गणेश पाटील, पीडब्ल्यूडी चे असिस्टंट इंजिनियर युनूस पिंजारी, विनोद सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
श्रीमती सरला हरिभाऊ पाटील एलआयसी अधिकारी, विजय जगन्नाथ बोरसे निवृत्त स्टेट बँक अधिकारी,दिलीप राजाराम सोनवणे अध्यक्ष साने गुरुजी ग्रंथालय, प्रकाश रामदास वाघ चिटणीस साने गुरुजी ग्रंथालय सौ उज्वला व चंद्रकांत नगावकर या मान्यवरांच्या दातृत्वातून विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्नेहल सिसोदे मेघा मोरे या विद्यार्थिनी सूत्रसंचलन केले तर केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष चिटणीस व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.
विविध स्पर्धा व बक्षिसे यांचा निकाल पुढील प्रमाणे..
सामान्यज्ञान स्पर्धा
योगेश प्रदीप पाटील, प्रथम
नम्रता दिलीप सोनवणे, द्वितीय
मयूर जितेंद्र पाटील, तृतीय
प्रिया राजूसिंग परदेशी, उत्तेजनार्थ जान्हवी आशिष जोशी,उत्तेजनार्थ
वकृत्व स्पर्धा
आदित्य दिलीप पाटील, प्रथम
विशाल संजय सोनवणे, द्वितीय स्नेहल योगेश शिसोदे, तृतीय
कुशल रवींद्र भदाणे ,उत्तेजनार्थ
प्रश्नमंजुषा स्पर्धा
गट क्रमांक दोन, प्रथम
गट क्रमांक तीन, द्वितीय
गट क्रमांक एक, तृतीय
गट क्रमांक सात, उत्तेजनार्थ
रांगोळी स्पर्धा
कोमल भोई- पूनम भोई,प्रथम
मेघा मोरे-जयश्री मोरे, द्वितीय
नम्रता सोनवणे-किरण लांबोळे, तृतीय
प्रिया परदेशी-आदित्य पाटील, उत्तेजनार्थ
वन मिनिट शो स्पर्धा
अजिंक्य प्रवीण सोनवणे, प्रथम
गायत्री कैलास पाटील,द्वितीय
स्नेहल योगेश शिसोदे, तृतीय
आदित्य दिलीप पाटील, उत्तेजनार्थ
तेजस्विनी मनोहर कोठावदे, उत्तेजनार्थ