मारवड: अमळनेर-नुकत्याच घोषित झालेल्या बारावीच्या निकालात ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड संचलित सु. हि. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ . साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 86.23 टक्के लागला आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांनी सदरचे यश संपादन केल्याने ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
यापैकी कला महाविद्यालयाचा 86.26% निकाल लागला असून यात चि.मोरे उदय पिंटू हा 73.00% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून कु.न्हावी तृप्ती संजय (70.82), कु.शिसोदे वैष्णवी दिलीप (66.33) हे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड संचलित सु. हि. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ . साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष आबासो. जयवंतराव पाटील, संस्थेचे सचिव तसेच संचालक मंडळ व प्राचार्य एल. एन. सैंदाणे यासह संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.