अमळनेर: नुकताच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकालात राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू जय योगेश्वर उच्च महाविद्यालयची विघ्यार्थी स्नेहल शत्रुघ्न माळी हिला इयता १२ विज्ञान शाखेमध्ये ८६.८३ टक्के मिळाले असून चालू शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये तिने विविध राष्ट्रीय स्पर्धमध्ये पदके मिळविले असून त्यात राष्ट्रीय शालेय सायकलिग स्पर्धा रांची राज्य (झारखंड) या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत कु. स्नेहल हिने २ गोल्ड मेडल घेतले आहेत. तसेच राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य स्पर्धा विजापूर राज्य कनार्टक २०२४ यात १ कास्य पदक खेलो इंडिया सायकलिग स्पर्धा चैनई राज्य-तामिळनाडू २०२४ मध्ये १ सिल्वर, १ कास्य पदक, राष्ट्रीय ट्रॅक अजिक्यपद सायकलिंग स्पर्धा २०२४ यात १ सिल्वर पदक मिळविलेले असून अनेक राज्यस्तरीय स्पर्धामध्ये विजेते पदके प्राप्त केलेले आहे. राष्ट्रीय शालेय सायकलींगस्पर्धेत २ सुवर्ण पदक मिळाल्याने तीला शालेय शैक्षणिक मंडळाकडून २० मार्क बोनस म्हणून देण्यात आलेले आहेत.
स्नेहल शत्रुघ्न माळी हि सायकलिग मध्ये गेल्या ४ वर्षा पासून राष्ट्रीयस्तरावरती अनेक सुर्वण, कास्य, रौप्य पदक प्राप्त करत असून अभ्यासातही ती सातत्याने चांगल्या गुणांनी होत आहे. तिच्या यशामध्ये तिचे मुख्याध्यापक कैलास पाटील, शिक्षकांचा व खेळाकरीता उपाध्यक्ष सायकलिग फ्रेडरेशन ऑफ इंडिया प्रताप जाधव,उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया संजय साठे, प्रशिक्षक दर्शन बारगजे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. स्नेहल चे वडील शत्रुघ्न माळी, हे निगडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्नेहल हिचे दुहेरी यशाबद्दल मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे,माजी विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, व्यापारी पंकज मराठे, योगेश येवले, विजय मोरे, निलेश पाटील, विजय पाटील, श्याम संदानशिव,पत्रकार दिनेश पालवे,रवींद्र पाटील ,जितेंद्र जैन ,मुन्ना जैन, कैलास यादनिक, अभिजित जैन, नवीन जैन,हितेंद्र पाटील यांनी कौतूक करून पुढील वाटचाली करीता सुभेच्छा दिलेल्या आहेत.