वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

अमळनेर :-शहरातील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि . 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 180 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस आले असून त्यातून 144 मुलांना नियुक्ती पत्र देण्यात आले ह्या सर्व 144 मुलान मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट असे सर्वांना येत्या 20 /05/2024 रोजी संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत ट्रान्समिशन ह्या. कंपनी मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. ह्या मेळाव्याचे सर्व स्तरांवर व सर्व पालकांन कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. कारण की या सर्व 144 मुलांना एकाच वेळी नियुक्ती पत्र देऊन सर्वात मोठ्या मंदीच्या काळात देखील सर्वाच्या जिव्हाळ्याचा असा नोकरीचा प्रश्न यामुळे सुटलेला आहे. असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले , तसेच औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन कंपनीचे जनरल मॅनेजर अंजली भट व एच आर मॅनेजर मंगेश पाटील यांनी कंपनी व कंपनीचे उत्पादना विषयी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करून दिले,  या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री चंद्रकांत भदाणे सर,संचालक धन:श्याम भदाणे, ITI चे प्राचार्य श्री प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील, सचिन माळी , सुनिल मगरे , विजय चौधरी, सखाराम पावरा व सर्व कर्मचारी वृंद व पालक विद्यार्थी उपस्थित होते, तसेच संस्थे तर्फे प्राचार्य श्री. प्रकाश पाटील सरांनी आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]