अमळनेर :येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित मोफत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्रातर्फे यावर्षी इयत्ता १२ वी पास व त्यापुढील विद्यार्थी व पालकांसाठी दोन दिवसीय करियर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन १९ व २० मे रोजी करण्यात आले आहे.
१९ रोजी सकाळी साडे आठ वाजता कार्यशाळेचे उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष पू. साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे तर काही मान्यवर प्रमूख अतिथी असणार आहेत. २० रोजी दुपारी तीन वाजता समारोप व बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले तर काही मान्यवर प्रमूख अतिथी असणार आहेत.
या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध स्पर्धा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून विद्यार्थी व पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.