प्रकाशभाई पाटील यांची अमळनेरच्या समाजकारणासह राजकारणात  एन्ट्री ?

सध्या विविध भेटींनी प्रकाश पाटील चर्चेत

अमळनेर: मूळ झाडी येथील रहिवासी व गुजराथ मधील सध्या पोलीस दलातील (एटीएस) निवृत्ती घेतलेले प्रकाश रघुनाथ पाटील सध्या अमळनेर तालुक्यात सक्रिय झाले आहेत.
त्यांची एन्ट्री अद्याप गुलदस्त्यात असून त्यांनी आगामी काळात राजकीय एन्ट्री घेणार की नाही याबद्दल अद्याप त्यांनी भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या तालुक्यातील सग्यासोयऱ्यांची भेटी गेल्या एक महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. गुजराथ पोलीस दलातील एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अनेकांना गुजराथ राज्यात सहकार्य केले आहे. त्यामुळे बऱ्याच चर्चेत असलेले प्रकाश भाई पाटील हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.
त्यांनी २०१८ साली झाडी येथे अत्यंत विलोभनिय असे शिवमंदिर तयार केले असून त्यावर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती. तसेच त्यांनी परिसरातील गावांना देखील भोजन यानिमित्ताने दिले होते. तालुक्यातील जनतेने हेलिकॉप्टर जवळ फोटो घेऊन आपली इच्छा भागवली होती. त्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी होते. अलीकडे गुजराथ एटीएस मधून निवृत्ती घेतली. आणि तालुक्यात चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी त्यासाठी एक निवासस्थान देखील याठिकाणी झाले असून अलीकडे त्यांचे येणे जाणे वाढले आहे. शिवरात्री पासून त्यांनी या भेटींना प्राधान्य दिले आहे. तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे.
विविध लग्नकार्य व इतर समारंभ व आताच नुकत्याच झालेल्या रमजान ईद निमित्त धार येथील दर्ग्यावर भेट दिली. त्यावेळी धार येथील प्रभारी सरपंच शशिकांत बोरसे, प्रहार जनशक्ती युवक तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच बाळकृष्ण पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, सोगन भिल, अ सत्तार मुजावर, विकास सोसायटीचे माजी चेअरमन वि एन मुजावर, अलीम मुजावर, राजू मुजावर, जाकीर शेख, कलीम मुजावर, नईम पठाण, हाजी मौलाना, खलील मुजावर, नशीर मुजावर, मुशीर मुजावर, जमाल मुजावर
अमळनेर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. तर ११ रोजी आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाला सायंकाळी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी आयोजकांतर्फे सत्कार केला. यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. लवकरच ते आपला निर्णय जाहीर असून याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]