अटकाव न्यूज
अमळनेर: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून यात अमळनेरचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश झाला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस आर कोहली यांनी नुकतीच ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र जाहीरनामा समितीत देखील सदस्य म्हणुन मंत्री अनिल पाटील यांचा समावेश झाला असताना आता पक्षाने त्यांच्यावर पुन्हा दुसरी मोठी जबाबदारी सोपविली आहे.सदर स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष ना अजित पवार,राष्ट्रीय कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पटेल,जनरल सेक्रेटरी सुनिल तटकरे,मंत्री छगन भुजबळ,मंत्री दिलीप वळसे पाटील,आ रामराजे निंबाळकर,मंत्री धनंजय मुंडे,मंत्री हसन मुश्रीम मंत्री धर्मराज बाबा आत्राम,मंत्री अनिल पाटील यासह एकूण 32 नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान वक्तृत्वकला,क्रियाशीलता व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून मंत्री अनिल पाटील यांचा राज्यभर प्रभाव वाढत असून आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर त्यांचे दौरे होऊन विविध ठिकाणी सभा गाजणार आहेत.सदर नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.