अमळनेर : तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने सकाळ पासूनच नागरिकांची लगबग असते. सकाळी शाळेतील व कॉलेजची मुलं,कामावर जाणारे कामगार, बांधकाम मजूर सर्वांची वर्दळ असते.अश्यातच शहरातील बुलेटस्वार आपली बुलेट सुसाट वेगाने चालवीत असतात. त्यांच्या या बुलेटचा आवाज व वेग समोरच्यांना धडकी भरवणारा असतो. शहरातील कॉलेज रोड,कोर्ट गल्ली, ग्लोबल इंग्लीश मिडीयम स्कुल रोड, स्वामी समर्थ गेट,सुभाष चौक,कृषी उत्पन्न बाजार समिती
,महाराणा प्रताप चौक परिसरात याचा सामना सामान्य नागरिकांना होत आहे. शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलींना कट मारतात.जेष्ठ नागरिकांसमोर बुलेटचा आवाज वाढवितात. शहरातील काही टार्गट बुलेटधारी तरुणांना पोलीस प्रशासन आवर घालेल का? असा सवाल नागरिकांडून होत आहे.
मी बाजार समितीत रात्री चक्कर मारायला गेलो असता गेट समोरून सुसाट वेगाने बुलेटस्वार आला मला कट मारून निघून गेला.त्यात मी पूर्ण जखमी झालो असून माझा पाय फ्रँक्चर झाला आहे. मला धुळे येथे उपचार करावे लागत आहे.व्यापार किती दिवस बंद राहील हे सांगता येत नाही. पोलिसांनी त्वरित नियमबाह्य बुलेट चालविणाऱ्यांना आवर घालावा व बंदोबस्त करावा.
पंकज मराठे(वाणी)
व्यापारी अमळनेर