अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.

अमळनेर:   ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने महिला दिनाचा विशेष कार्यक्रम समाज भगिनींसाठी आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंडळाच्या अध्यक्ष सौ तीलोत्तमाताई पाटील या होत्या, तसेच विचार मंचावर मंडळाच्या कार्यकारी संचालिका जयश्रीताई पाटील,मंगलाताई पाटील, प्रा शीलाताई पाटील ,पद्मजाताई पाटील, प्रभाताई पवार या होत्या . कार्यक्रमानिमित्त आयोजित स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्रा.डॉ.उषा पवार व प्रा.डॉ.नयना नवसारीकर यांनी काम पाहिले .
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदनेने झाली. कार्यक्रमानिमित्त विशेष वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचा विषय ‘आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या व्यक्ती’ असा होता.या स्पर्धेत मंडळाच्या एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम, माधुरी पाटील द्वितीय तर भारती यशवंत शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तसेच डॉ. वंदना पाटील ,सुरेखा खैरनार, सीमा पाटील, सुरेखा पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच सहभागी स्पर्धकांना देखील बक्षीस देण्यात आले.
मंडळाच्या सदस्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. अनेक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेले आहे .म्हणून यावर्षी अशा एकूण 21 सदस्य भगिनींचा मंडळाने मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. राजश्री पाटील सरपंच हिंगोणे खुर्द ,  सुलोचना वाघ सदस्य मजूर फेडरेशन, पल्लवी पाटील शिक्षिका सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, नंदा बोरसे उपशिक्षिका जि. प. कुऱ्हे खुर्द, अर्चना भामरे शिक्षिका लोकमान्य नवीन मराठी, डॉ.प्रा.नलिनी पाटील प्रताप कॉलेज अमळनेर, प्रज्ञा देसले वायरमन, अलका पाटील पोलीस पाटील अंबासन ढेकू, सुषमा देसले सरपंच दहिवद खुर्द, कल्याणी पाटील उप सरपंच शिरूर, प्रतिभा पाटील योग शिक्षिका, सुरेखा पाटील मुख्याध्यापिका जि.प.गांधली -पिळोदे, जयश्री पवार उपशिक्षिका जि. प. जळोद, माधुरी पाटील उपशिक्षिका योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक अमळनेर, रेखा मराठे शिक्षिका जि.प.टाकरखेडा, सविता अहिरे उपशिक्षिका व्ही . झेड.पाटील हायस्कूल शिरुड, प्रा. मंदाकिनी भामरे प्रताप कॉलेज अमळनेर, पुष्पा पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, सीमा रगडे तालुका समन्वयक उमेद अभियान, प्रतिभा भदाणे अंगणवाडी सेविका मंगरूळ. यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.भारती पाटील यांनी महिला दिना बाबत माहिती सांगितली.प्रमुख पाहुण्या माननीय स्मिताताई वाघ यांनी उपस्थित महिलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला आणि एकजुटीने ,एकमेकांच्या सोबतीने पुढे जाण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात तिलोत्तमाताई पाटील यांनी सर्व विजेत्या स्पर्धक व सत्कारअर्थी महिलांचे अभिनंदन केले.
आपल्या ओघवत्या शैलीने अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन भारती पाटील उपशिक्षिका दौ.रा.कन्या शाळा अमळनेर व भारती पाटील आधार संस्था यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या संचालक अलकाताई पाटील, कमलताई पाटील, सुलोचनाताई पाटील , सुनिताताई पाटील,लीनाताई पाटील, माधुरीताई पाटील, मनीषाताई पाटील ,रागिनीताई पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]