मंगरूळ विकास सोसायटी चेअरमनपदी विश्वास पाटील विजयी

चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मारली बाजी

अमळनेर:जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या मंगरूळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विश्वास अभिमन पाटील विजयी झाले.
परिवर्तन पॅनल तथा भाजपाचे भगवान पाटील,जे पी पाटील,राष्ट्रवादीचे दिपक बागुल,भाजपा तालुका सरचिटणीस राकेश पाटील,मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात चेअरमन पदी विश्वास पाटील विजयी झालेत.,या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी झाल्यात,परिवर्तन पॅनलचे ७ सदस्य व विरोधी पॅनलचे ६ सदस्य वेगवेगळे सहलीसाठी चार दिवस सहलीसाठी रवाना झाले होते विश्वास पाटील यांची चेअरमनपदी निवड होऊन नये म्हणून विरोधकांनी अथक प्रयत्न केले परंतु त्यांना परिवर्तन पॅनलच्या ७ सदस्यांनी जोरदार धूळ चारत,प्रामाणिकता दाखवत विश्वास पाटील यांना चेअरमनपदी निवडून दिले. संपूर्ण तालुक्याचे व पंचक्रोशीचे लक्ष या निवडीकडे लागले होते. निवडणूकीचे कामकाज सुनिल माळी यांनी पहिले.यावेळी सोसायटी सदस्य कैलास पाटील,रणछोड बागुल,विनोद पाटील,घोलप सर,इंदुबाई पाटील सचिव निरंक पाटील,मनोहर पाटील,वाल्मिक पाटील,भिला पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]