
महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यात महिलांचा सत्कार
अमळनेर : स्त्री एक विद्यापीठ आहे, तिच्यामध्ये अचाट शक्ती आहे. तिचे पारडे नेहमीच जड असते फक्त तिला तिच्या अस्तित्वाची आणि शक्तीची जाणीव नसते. संस्कृतीचा ऱ्हास होऊ नये म्हणून मातृसत्ता आली पाहिजे असे प्रतिपादन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी पोलीस स्टेशन मध्ये आयोजित महिलादिनानिमित महिलांच्या सत्कार प्रसंगी केले.
पोलिसांनंतर ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महिला पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समिती सदस्या यांच्यासहित सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या महिलांचा महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएसपी सुनील नंदवाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त डीवायएसपी विलास सोनवणे , पोलिस निरीक्षक विकास देवरे , कृउबा माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रा शिला पाटील , अलका गोसावी , खान्देश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी पाटील , भारती शिंदे ,योजना पाटील ,मनीषा परब तसेच पोलीस पाटील कविता पाटील , योगिता पाटील ,मीना महाजन , लक्ष्मी शिंदे ,रेखा पाटील , भारती पाटील , सुनंदा खैरनार , सोनल पवार , अलका पाटील ,प्रतिभा देसले , कविता पाटील , भारती पाटील ,अश्विनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सिद्धांत शिसोदे , मिलिंद बोरसे यांनी केले होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.