शिरूड येथे शालेय समितीने केले नूतन मुख्याध्यापकांचे स्वागत


अमळनेर : शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे नवीन रुजू झालेले मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या सत्काराचे आयोजन शालेय समितीच्या वतीने स्थानिक स्कूल कमिटी डायरेक्टर पुष्पलता अशोक पाटील यांनी केले होते.
शिरुड येथे मुख्याध्यापक पदी आर ए शिंदे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या जागी बदलून आलेले अनिल पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानंतर शिरुड येथील स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने त्यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्कूल कमिटी सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी साने गुरुजी पतपेढी महिला राखीव गटात निवडून आलेल्या सविता बोरसे यांचा देखील स्थानिक स्कूल कमिटी सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय समिती सदस्य , शेतकी संघाचे माजी अध्यक्ष श्री. काळू नाना पाटील, माजी उपसरपंच डी.ए. धनगर , माजी उपसरपंच वसंतराव पाटील,श्री.पुंजू बापू पाटील , माजी सरपंच बापूराव महाजन, विजय बोरसे, नंदलाल अहिरे, अतुल सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नूतन मुख्याध्यापक म्हटले की शाळेला उर्जित अवस्था आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. विद्यार्थी विकासाचा ध्यास घेऊन पालकांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. असे आश्वासक बोल त्यांनी काढले. सविता बोरसे यांनी देखील शालेय समितीचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]