अमळनेर: येथील पीबीए इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचा पहिला गट व इयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चा दुसरा गट अशा दोन विभागात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते.
सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक व परीक्षक म्हणूनअमळनेर शहरातील विज्ञान शाखेसाठी अतुलनीय कार्य केलेल्या अध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना आमंत्रित केले होते. यामध्ये प्रा. एम.एस. बडगुजर, प्रा. पी.आर. भावसार, श्री. विनोद कदम व श्री. भटू पाटील यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सदर विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले प्रोजेक्ट व वर्किंग मॉडेल बघून परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्ता, कल्पनाशक्तीचे कौतुक केले.
सदर विज्ञान प्रदर्शना दरम्यान मान्यवरांनी आपल्या मनोगतात, भारताचा भविष्यकाळ भारताला महासत्ता बनवणारा असेल अशी अशी खात्री देत, सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर विज्ञान प्रदर्शनास भेट देण्यासाठी शहरातील मान्यवर, बहुसंख्य पालक व अन्य शाळांमधील शिक्षक व विद्यार्थांनी उपस्थिती देत, प्रदर्शनात सादर केलेल्या प्रयोगाची मीमांसा व कार्यप्रणाली समजावून घेतली. लहान वयात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण व मानव जातीला उपयुक्त ठरेल, अशा संशोधनात्मक कार्याची स्तुती केली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. जे. एस. देवरे यांनी मनोगतातून जागतिक स्तरावर भारत हा येणाऱ्या काळातील प्रयोग व संशोधनाची जननी म्हटली जाईल व एक प्रभावशाली महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
सदर विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन मा. डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक श्री .जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम.एस. बारी, विज्ञान शिक्षिका सौ. व्ही.एस. अमृतकर, सौ. स्वाती माळी, सौ. सुवर्णा भावसार, सौ. डिंपल देसाई, सौ. प्रीती बडगुजर, सौ. व्ही. जी. बोरोले, श्री. एस. एस. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.