श्री मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचा उपक्रम

अमळनेर : कुठल्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही सकारात्मक भावना डोळ्यासमोर ठेवून मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा अमळनेर शहर व तालुक्यासह उत्तर महाराष्टÑातील विविध ठिकाणच्या शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणीसह उपचार व निदान तसेच बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.
सुरूवातीस श्री मंगळग्रह देवतेचे विधिवत पूूजन करुन शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी जनरल सर्जन डॉ. प्रशांत सूर्यवंशी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी विपणन व्यवस्थापक प्रवीण खरे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या मनीषा चौधरी तसेच परिचारीका यशोदा साबळे व मिरीयम राऊत, वॉर्ड मावशी सुहासिनी…., चालक शिवराम देशमुख यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसह मंगल सेवेकरी व्ही. व्ही. कुलकर्णी, विनोद कदम, पुषंद ढाके यांच्यासह मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात सर्व रुग्णांची रक्तदाब, मधुमेह तपासणीनंतर महिलांमधील लघवी, शरीरातील विविध गाठी, गर्भाशयातील विविध विकार तसेच पुरुषांमधील विविध आजारांची लक्षणे लक्षात घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासह शस्त्रक्रियेसंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांनी बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. महाले यांनी शिबिर घेण्यामागचा उद्देश विशद केला. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]