देवगाव देवळी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप…

गुणवत्तेची तडजोड करू नका- अध्यक्षीय भाषणात विलासराव पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर : चांगली शाळा ही गावाचा आरसा असते.. त्या शाळेत चांगले शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांचा सर्वागिन विकास होऊन विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवतांना समाधान मिळत आहे.. महात्मा फुले यांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू केल्याने आज तिचे वटवृक्षात रूपांतर झाले.. विद्यार्थीच शिक्षकाच्या कार्याची पोचपावती असतात त्यामुळे गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका..प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून देवगाव देवळी हायस्कूलचे चेअरमन व संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते..
व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष दादासो नवल पाटील, संस्थेचे जेष्ठ संचालक, धर्मराज पाटील, झावरू पाटील,राजाराम बैसाणे,एन.जी.देशमुख, शिक्षण प्रेमी सुरेश पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन होते..
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले…
कार्यक्रमात वर्षभरातील विविध उपक्रमांचे अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले..
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जयश्री पाटील ,श्वेता बैसाणे, भाग्यश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले..तर संस्थेचे जेष्ट संचालक धर्मराज पाटील म्हणाले की
संघर्षाला कधीही दुर्दैव मानून पळ काढू नये. संघर्षास सामोरं जाणा-याला हमखास यश मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो, हे महत्त्वाचं असतं.. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै एस.एल पाटील यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू करून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करत असल्याचा अभिमान आहे.. शैक्षणिक गुणवत्ता शिक्षकांनी अविरत जोपासली आहे संस्थेने योग्य शिक्षकांची निवड केल्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला मिळत आहे.. असे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या गुणांचे कौतुक केले…
संस्थेचे उपाध्यक्ष नवल दादा पाटील म्हणाले की गुणवत्तेशी तडजोड करू नका.. प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला शुभेच्छा दिल्या…
दहावी मागच्या वर्षी प्रथम आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री महेंद्र पाटील हिला रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार मान्यवरांनी केला.. अखिल भारतीय हिंदी परीक्षेत 100% निकाल लागल्यामुळे परीक्षेचे मार्गदर्शक
मुख्याध्यापक अनिल महाजन व शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा हिंदी परीक्षा प्रमुख ईश्वर महाजन यांचा सन्मानपत्र व मेडल देऊन मान्यवरांनी सन्मान केला..
वर्गशिक्षक अरविंद सोनटक्के यांना दहावीचे विद्यार्थ्यांनी गिफ्ट देऊन सत्कार केला…
नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी फोटो सेशन केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी मानले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]