राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

अमळनेर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्त एकदिवसीय भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात असून,त्याच अनुषंगाने शुक्रवारी १६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.शस्त्र संग्राहक व अभ्यासक पंकज दुसाने यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]