जयदीप पाटील यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड

अमळनेर : तालुक्यातील खडके येथील जि.प.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड पार पडली.यात अध्यक्षपदी मनोज (जयदीप) भरत पाटील यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया करण्यात आली.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष जागृती गणेश पाटील, सचिव विलास बापु मोरे (मुख्याध्यापक), सदस्य रेखाबाई पाटील, मनीषा पाटील, नरेंद्र ब्राह्मणे, समाधान पाटील, सुनिल देवरे, कविता पाटील, दानविर पाटील, राजश्री पाटील, प्रकाश भिल, सीमा भिल, सरला भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जयदीप पाटील यांच्या निवडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ, सर्व शिक्षक वर्ग, आजी माजी विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन कमिटीने अभिनंदन केले आहे. गावातील शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयदीप पाटील यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ मंडळ, शिक्षक वर्ग, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]