अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान यशस्वीरीत्या झाले संपन्न

अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान दि.२७ जानेवारी२०२४ शनिवार रोजी सुरू करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम २७ जानेवारीला अमळनेर पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. क्षेत्रभेटीदरम्यान पोलीस अधिकारी डॉ. शरद पाटील यांनी विद्यार्थिनींना सायबर क्राईम व सोशल मीडिया यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पोलीस स्टेशनची कार्यपद्धती व महिला सुरक्षा याबद्दल उपयुक्त अशी माहिती दिली. अभियानाच्या दुसऱ्या दिवशी दि. २९ जाने रोजी महाराष्ट्र बँक, अमळनेर चे मुख्य व्यवस्थापक श्री. देवेंद्र तायडे यांनी विद्यार्थिनींना बँकेची कार्यपद्धती, ऑनलाइन व्यवहार, आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाईन फ्रॉड, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातल्या विविध रोजगारांच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. दि. ३० जाने रोजी अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉ.लीना चौधरी मॅडम यांनी विद्यार्थिनींना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. संगीता चंद्राकर या होत्या. कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी दिनांक ३१जानेवारी रोजी दर्शना पवार मॅडम यांनी स्किल डेव्हलपमेंट या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दिनांक १ फेब्रुवारी रोजी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील डॉ. भरत खंडागळे सर यांनी विद्यार्थिनींना रोजगाराच्या विविध संधी या विषयावर मार्गदर्शन केले. दि. २ फेब्रुवारी रोजी याअभियानाच्या समारोप कार्यक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य व प्रताप महाविद्यालयाचे डॉ. संदीप नेरकर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित विद्यार्थिनींनी सहा दिवस चाललेल्या या अभियानाचे अहवाल वाचन केले. विद्यार्थिनींनी अपयशा त अपयश आले तरी खचून न जाता नवीन आत्मविश्वासाने येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे असे मनोगत डॉ. संदीप नेरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवती सभाप्रमुख प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.रमेश पावरा यांनी केले.

अटकाव न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]