लेखिका दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ या पुस्तकाचे प्रकाशन

अमळनेर : येथील सानेगुरुजी विद्या मंदिर येथे लेखिका दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ या पुस्तकाचे प्रकाशन रमाई जयंती निमित्त विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर विविध शाळेतील विद्यार्थिनींना रमाई पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.
रमाई जयंती निमित्त साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये चेतश्री प्रकाशन संस्थेचे प्रकाशक चेतन सोनार, विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजीत शिंदे आणि युवा नाट्य कलावंत कु भूमिका घोरपडे यांचे हस्ते रमाई या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रमाई जयंती निमित्त
श्रीमती प्रतिभा प्रकाश शिदिड यांच्या दातृत्वतून सदर पुस्तकाचे वितरण साने गुरुजी विद्यालय अमळनेर, मंगरूळ हायस्कूल व रणाईचे आश्रम शाळा तसेच रमाई ढोल पथकाच्या विद्यार्थिनीं व महिलांना मोफत करण्यात आले.
सानेगुरुजी विद्यालय येथे प्रास्ताविकात बदलत्या काळातही रमाईंची जीवन हे लढणाऱ्यांसाठी बळ देत राहील असे लेखिका दर्शना पवार यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थिनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संवादाच्या आधारे ‘अडचणीच्या काळात केलेल्या मदतीच्या बदल्यात मोबदल्याची अपेक्षा करू नये अन्यथा केलेली मदत व्यर्थ ठरते !’ असे रमाबाईंच्या जीवनातील
आदर्श व जीवनाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी मुलांच्या लक्षात आणून दिल्यात. चेतन सोनार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन करीत महामानवांच्या जीवनातील विविध घटना,प्रसंग वाचनाने आपले व्यक्तिमत्व ही संपन्न होते असे सांगितले.यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी संघर्ष करतांना महामानवाच्या जीवनाचा अभ्यास करावा असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे ,सुनिल पाटील, मंगरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, रणाईचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र नेरपगार रमाई ढोल पथकाच्या प्रमुख अनिता संदानशिव यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]