अमळनेर:-28 तारखेला वार रविवार रोजी, सक्सेस अकॅडमीतील बारावी विद्यार्थ्यांंना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुका पोलिस स्टेशन येथील डीवायएसपी माननीय, नंदवाळकर साहेब, यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल फोन अति वापरामुळे परीक्षा वरती होणारे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांची सहानुभूती जपत भावी आयुष्याच्या वाटचाली कशा पद्धतीने असाव्यात, आपण आपलं येणार भविष्य कशा पद्धतीवर निवळावे, यांचा सखोल अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःही बारकाईने घेतलेले अनुभव सर्व तळागाळातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपभीती सांगून परीक्षेला न घाबरता आयुष्यभर आपल्याला परीक्षा द्याव्याच लागतात, आपण स्वतःला कधीही कमजोर न करता, तुम्ही सर्व यशाची पायरी घाटू शकता, अशा पद्धतीचं सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना, मोटिवेशन दिलं, तसेच विज्ञान व गणित विषय यांच्या मूलभूत संकल्पना कशा लक्षात ठेवाव्या यावर विशेष मार्गदर्शन केले. तर दुसरे प्रमुख पाहुणे माननीय निरंजन पेंढारकर सर यांनी विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या विविध विषयावर चर्चा करून, आपल्याला चांगल्या प्रकारची, संधी व ISRO मध्ये जाण्यासाठी कोणत्या टप्प्यातून जावे लागते याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच गणित मंडळाचे अध्यक्ष माननीय गोपाल हडपे सर, यांनी गणिताच्या मूलभूत संकल्पना विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. एक आदर्श पालक म्हणून माननीय संतोष पाटील, पत्रकार, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा अध्यक्ष जळगाव, यांचा डीवायएसपी, मा, नंदवाळकर साहेबांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक, मा, प्रदीप भाऊ अग्रवाल, मुडी संस्थेचे संचालक मा, राजेंद्र निंबाजी पाटील,मा, धनगर सर, डॉ ज्ञानेश्वर पाटील टाकरखेडा, सर्व मान्यवर उपस्थित होते. सत्काराच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी वर्षभरातिल सर्व लेखा-जोखा, एकमेकांशी अभ्यासावरील, चर्चा करून , विविध सांस्कृतिक, क्रिकेट, डान्स कॉम्पिटिशन, इत्यादी विविध, कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला, अतिशय आनंदी उत्साहित, खेडीमेडीच्या वातावरणात, सक्सेस अकॅडमी चा निरोप समारंभ पार पाडण्यात आला. निरोप समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी गौरव धनगर सर, प्रगती कोचिंग क्लासेस संचालक, ऍड अनिल माळी व संदीप महाजन सर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सक्सेस अकॅडमी चे संचालक पवन पाटील सर, यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे भरभरून सांत्वन केल..