जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम

अमळनेर : महाराष्ट्र शासन संचलित नेहरू युवा केंद्र,जळगाव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एम.ए. राज्यशास्त्र द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
माय भारत-विकसित भारत-2047 या विषयावर निर्भय सोनार याने प्रभावी भाष्य केले. मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
या निवडी बद्दल निर्भय सोनार यांचे स्वागत व कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी केले. डॉ.विजय तुंटे, डॉ.एस.बी.नेरकर, ऍड.सारांश सोनार यांनी निर्भयला मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.जे.बी.पटवर्धन, डॉ.धीरज वैष्णव, डॉ.कुबेर कुमावत, डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.तुषार रजाळे, डॉ.आर.सी.सरवदे, डॉ.अमित पाटील,प्रा.नितीन पाटील, डॉ.माधव भुसनर, डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे, डॉ.रमेश माने, डॉ.विलास गावीत, प्रा.जयेश साळवे, क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, डॉ.कैलास निळे, प्रा.सुनील राजपूत, डॉ.राखी घरटे, डॉ.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी, प्रा.नितीन पोपट पाटील, डिगंबर महाले, डॉ.जी एम पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, सचिन खंडारे, प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा एस ओ माळी, पत्रकार बांधव व सुवर्णकार समाज आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]