अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन.

अमळनेर: तालुक्यातील पाडळसे गावात कृषिदूतांकडून शेतकयांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषिदूत प्रतिक ज्ञानेश्वर पाटील,जयेश संजय पाटील, शिवप्रसाद बाळासो पाटील,रविंद्र ओ-या वसावे,धवल तुषार वाघुळदे यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच श्रीमती शुभांगी सचिन पाटील, उपसरपंच शिवाजी केशव पाटील, ग्रामसेवक सुभाष आनंद भोई , शेतकरी अविनाश पाटील,भागवत पाटील,चंद्रकांत पाटील,मनोज गोकुळ पाटील,गोकुळ भिका पाटील,भूषण गुर्जर, उमरसिंग पाटील, भरत पाटील, गोपाळ पाटील ,राजेंद्र पाटील ,सुभाष पाटील ,योगेश पाटील व ग्रामस्थ यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. या कार्यक्रमात अमळनेर येथील
नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, रावे प्रोग्राम ऑफिसर मा.प्रा. गिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. संदिप साळुंखे, प्रा. तुषार देसले, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. शिवाजी गावीत प्रा. अमोल घाडगे, प्रा. महेश चव्हाण, प्रा. घनश्याम पवार, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा. सुदीप पाटील, प्रा. राम रजितवाड, प्रा.सुदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत हे गावा-गावातील पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परिक्षण कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेती विषयक विविध समस्या तसेच त्यावरील उपाय, पीक प्रात्यक्षिक तसेच इतर शेती संबंधी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *