नीम येथे शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून मार्गदर्शन…

अमळनेर: तालुक्यातील निम येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जात असून नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी त्याठिकाणी दाखल झाले आहेत.

या कृषिदूतांमध्ये भावेश अनिल सावंत ,प्रल्हाद अशोक आवारे, यश मोतीलाल माळी ,भावेश अरून पाटील ,मनीष अरून पाटील ह्यांचा समावेश असून त्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच भगवान भिल, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक – जगदीश पाटील,शेतकरी महेश पाटील, स्वप्नील पाटील, घनश्याम पाटील, प्रताप पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले.

कृषिदूतांनी पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण, कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक विविध समस्या याविषयी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]