भक्ती-शक्ती संवाद यात्रानिमित्त अक्षयमहाराज भोसले यांची मंगळग्रह मंदिरास भेट

अमळनेर : महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा जागर व्हावा, या उद्देशाने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेतर्फे भक्ती -शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष अक्षयकुमार भोसले यांनी येथील मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन तथा आशीर्वाद घेतले. मंदिराच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी मंदिराविषयी माहिती देऊन भविष्यातील नियोजनाविषयी चर्चा केली.
भोसले यांच्यासमवेत आलेले शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, धुळे महानगर प्रमुख संजय वाल्हे, उपमहानगर प्रमुख अजय पाटील यांचे स्वागत डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, सह सचिव दिलीप बहिरम आणि विश्वस्त अनिल अहिरराव यांनी केले.

यावेळी श्री.भोसले यांनी सांगितले की ,छत्रपती शिवाजीमहाराजांच्या व सकल संताच्या विचारांवर चिंतन मनन करुन कार्य करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आध्यात्मिक क्षेत्राबाबत अत्यंत संवेदनशील व पूज्य भाव असणारे आहेत. त्यांच्या याच विचारांना महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी २५ डिसेंबर २०२३
ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या भक्ती-शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा नियोजित प्रवास उत्तर महाराष्ट्र नाशिक १४ व १५ जानेवारी, धुळे १६ जानेवारी, नंदुरबार १७ जानेवारी तर जळगाव १८ जानेवारी असा प्रवास असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]