शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी दिलीप बहिरम यांची नियुक्ती

अमळनेर: येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक दिलीप आत्माराम बहिरम यांची शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी १७ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी स्वतः नियुक्ती पत्र देऊन ही नियुक्ती केली. त्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार व प्रसार तसेच शिवसेना पक्षवाढीसाठीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

श्री. बहिरम यांच्या या नियुक्तीचे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी विनोद कदम, मंगल सिक्युरिटी सर्व्हिसेसचे राजेंद्र यादव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील,भोला टेलर व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. तसेच आध्यात्मिक क्षेत्रासह विविध समाजघटकांनी अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]