
अमळनेर: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी डांगर बु ! येथील सक्रिय कार्यकर्ते सचिन वाघ यांची निवड झाली असुन यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्र दिले असुन नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी च्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आ. डॉ. बी. एस पाटील,यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा अध्यक्ष यांनी निवड केली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील,ग्रंथालय सेल प्रदेश संयोजक रिता बाविस्कर,जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी दयाराम पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष एम डी पाटील,किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील,योगेश सिसोदे,प्रा. शशी साळूंखे,योगेश पाटील, प्रशांत पाटील, ललित पाटील, शरद पाटील, रवी पाटील,सतिष कापडणे,आदींनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील,यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात ग्रामीण भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे उभारून पक्षाचे ध्येय धोरण व शरद पवार साहेबांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम तालुकाभर करण्याचे सचिन वाघ यांनी सांगितलं आहे.