शालेय जीवन हे आयुष्यातील सोनेरी पान:-ना.अनिल पाटील

जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अमळनेर: विद्यार्थी जीवनात शिस्त,जिद्द,चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचा राजमार्ग सापडत असून शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी केले.जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेच्या २ दिवसीय स्नेहसंमेलनात ना.पाटील हे अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.बांधकाम व्यावसायिक तथा संस्थाचालक ओमप्रकाश मुंदडा, मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे,महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रकाशचंद हिरालाल पारख हे प्रमुख अतिथी होते.
शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन १२ व १३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले.यावेळी व्यासपीठावर
खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष तथा कै.र.सा.पाटील शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,खा.शि.मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे,संचालक सी.ए.नीरज अग्रवाल,विनोद पाटील,जी.एस.हायस्कूल चे चेअरमन हरी भिका वाणी,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन भदाणे, मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस पाटील,डी.आर.कन्या.शाळेचे उपमुख्याध्यापक एस.बी.निकम,
पर्यवेक्षक ए.डी.भदाणे,एस. आर.शिंगाणे,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एस पी शिसोदे,कैलास पाटील,महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी आर.एन.पारधी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.एल.मेखा,आर.एल. माळी,वाडी संस्थानचे शारंगधर गुरुजी,शिक्षकेत्तर प्रतिनिधी एस.एम.पवार उपस्थित होते.ना.अनिल पाटील पुढे बोलले की,स्नेहसंमेलातुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाकार तयार होत असतात.खानदेश शिक्षण मंडळ संस्थेचा नावलौकिक खूप मोठा असून संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी येणाऱ्या काळात विशेष फंडातून निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.एस.पाटील केले.डॉ.अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आनंद मेळाव्याचे उदघाटन ना.अनिल पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील शाळेच्या नावाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडण्यात आले. दुपार सत्रात भारुड,नाटक,आदिवासी नृत्य,आध्यात्मिक गीत,तसेच मराठी, हिंदी चित्रपटातील सदाबहार नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १३ रोजी शेलापोगेटे, प्रश्नमंजुषा,फॅन्सी ड्रेस,तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.विविध सत्रांचे सूत्रसंचालन उपशिक्षक अमित पाटील, एम.ए.पाटील,

उपशिक्षिका जे.बी.इंगळे,
टी.एम.शेख,देवयानी भावसार यांनी केले.आभार उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]