देवगांव देवळी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरण साजरी करण्यात आली..
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरविंद सोनटक्के होते…
अगोदर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केले तर स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले..
यावेळी इयत्ता आठवीतील निशा जाधव कांचन जाधव यांनी जिजाऊ मातेवर कविता सादर केली.. तर इयत्ता नववीतील रागिनी पाटील सोनाली महाजन यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला..
अध्यक्षीय भाषणात अरविंद सोनटक्के म्हणाले की राजमाता जिजाऊ यांचे कार्य तमाम महिला वर्गाला प्रेरणादायी आहे..
स्काऊट शिक्षक एच.ओ माळी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन सर यांनी केले.. आभार प्रदर्शन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी मानले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजीराव पाटील,गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]