डॉ.संग्राम पाटील यांनी विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून वैचारिक पेरणी करीत केले भूमीपूजन

अमळनेर: येथिल विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमीपूजन केले. “विद्रोहाचा प्रवाह हाच मुख्य प्रवाह आहे! असे यावेळी डॉ.संग्राम पाटील यांनी सांगितले.
“विचार करुन प्रश्न विचारणे आणि सत्य सांगण्याची संत तुकारामांची विद्रोही परंपरा १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पू.सानेगुरुजीच्या अमळनेरमध्ये सुरू असल्याने इंग्लंड हून अमळनेर ला आलो असल्याचे यावेळी डॉ.संग्राम पाटील यांनी सांगितले.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर के पटेल उद्योग समूहाचे उद्योगपती प्रविण पाटील हे होते. यावेळी मंचावर ग स बँकेचे संचालक राम पवार, खानदेश शिक्षण व मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,जनक्रांती मोर्चा मुकुंद सपकाळे,सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, निर्भंगवालीकार प्रा.शिवाजीराव पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, प्रा सत्यजित साळवे, मनोहर पाटील, आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत ग्रंथ भेट देवून करण्यात आले. विद्रोही साहित्य संमेलनासाठी उत्स्फर्तपणे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.संग्राम पाटील यांनी उद्योगपती प्रविण पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी तर सूत्रसंचालन निमंत्रक रणजित शिंदे यांनी केले. आभार स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी मानले.
यावेळी साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रा.गौतम निकम, प्रा. सुभाष पाटील,बापूराव ठाकरे, कैलास पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील,डॉ. दिनेश पाटील, डॉ.किरण पाटील, बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम,जेष्ठ कार्यकर्ते भागवत सूर्यवंशी,काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , धनगर दला पाटील , दयाराम पाटील, प्रेमराज पवार ,मिलिंद निकम, संजय पूनाजी पाटील, प्रा.माणिक बागले, प्रा. प्रमोद चौधरी, महेश पाटील, तुषार संदांनशिव, श्रीकांत चिखलोदकर , अजिंक्य चिखलोदकर, अजय भामरे, प्रा.किरण गोसावी, देवदत्त सदांशिव, दिपक बिऱ्हाडे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]