आंतरराष्ट्रीय धावपटू सौ.क्रांती साळवी (शिंदे) यांची प्रमुख उपस्थिती…
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अमळनेर येथील व्हाईस ऑफ मेडिया तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यामार्फत महिलांसाठी खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मॅरेथॉन स्पर्धेत महिलांनी/ तरुणींनी आवर्जून स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन दोन्ही पत्रकार संघटनांकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत 15 वर्षे पुढील महिला/ तरुणींना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, सदर स्पर्धेत येताना सोबत वयाच्या पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत असे आवश्यक आहे, या स्पर्धेत स्वतःच्या जोखमेवर उपस्थित व्हायचे आहे, स्पर्धेदरम्यान कुठलेही ईजा, अपघात झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी लागणार आहे, बेसिस्त वर्तन करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय धावपटू, गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड धारक सौ. क्रांती साळवी (शिंदे) यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 12 जानेवारी रोजी महाराणा प्रताप चौक,कचेरी समोर सकाळी 8 ते 9 या या वेळेत नोंदणी होणार असून मोठ्या संख्येने महिलांनी/ तरुणींनी उपस्थित राहावे.
स्पर्धेचे प्रायोजक मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्यामार्फत करण्यात आले आहे.