अमळनेर शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

अमळनेर: अमळनेर शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी नूतन शहराध्यक्ष विजयसिंग पंडित राजपुत यांनी जाहीर केली असून सदर कार्यकारिणीत 61 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सदर शहर कार्यकारणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने,ना देवेंद्रजी फडणवीस, ना. गिरीश महाजन,विजय चौधरी, रवीजी अनासपुरे,जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, खा. उन्मेष पाटील आणि मा. आ. श्रीमती. स्मिताताई उदय वाघ यांच्या सूचनेनुसार शहर अध्यक्ष विजयसिंग राजपुत यांनी अमळनेर शहर मंडल कार्यकारणी जाहीर केली आहे.सदर कार्यकारिणी करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ बसवून सामाजिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सर्वाना सहभागी करण्याचा प्रयत्न शहराध्यक्ष यांनी केला असून पक्षाचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी सक्षम ठरणार आहे.सदरील निवडीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

अशी आहे शहर कार्यकारिणी,,,
शहराध्यक्ष-विजयसिंग पंडित राजपुत,उपाध्यक्ष पदी – सुभाष उखडू पाटील,कैलास रामलाल भावसार,दिपक भटू भोई,रावसाहेब सुर्यवंशी,विनोद जगदीश अग्रवाल,योगेश गोविंदा महाजन,चंद्रकांत देविदास कंखरे,दिपक गणेश पाटील
सरचिटणीस पदी – दिलीप धोंडू ठाकूर,गोकुळसिंग साहेबसिंग परदेशी
चिटणीस पदी-दिपक रमेश चव्हाण,नुतन महेश पाटील,कविता चेतन जाधव,महावीर किशोर मोरे,शेखर सुभाष मराठे,तुळशीराम भिकन हटकर,महेश चंद्रकांत संदानशिव,दिनेश मोतीलाल सोनवणे ,कोषाध्यक्ष पदी – अनिल वसंत लाड तर कार्यकारी सदस्य म्हणून 13 जणांचा तर कायम निमंत्रित म्हणून 18 जेष्ठ नेते व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]