खडके येथून महिला व लहान मुलगा दोघे बेपत्ता

अमळनेर पोलिसात पत्नी व मुलगा हरवल्याची केली तक्रार

अमळनेर: तालुक्यातील खडके येथून एक महिला व तिचा लहान मुलगा दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार अमळनेर पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील खडके येथील प्रमिला कपिलदेव पाटील(वय-२४)व त्यांचा मुलगा प्रसाद कपिलदेव पाटील(वय-दीड वर्ष) हे ३१ डिसेंम्बर (रविवार) च्या सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून खडके येथून बस मध्ये बसले मात्र सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही सापडले नाहीत.
कपिलदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार अमळनेर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सफौ. संजय पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]