अमळनेर: सालाबादा प्रमाणे लाडशाखीय वाणी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन(आपत्ती व्यवस्थापन)मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी लाड शाखीय वाणी पंच मंडळातर्फे मंत्री अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सदर समारंभ दोन दिवसांचा होता, दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगावचे प्रतिष्ठित व्यापारी काशिनाथ रामकृष्ण पाटे व शकुंतला काशिनाथ शेंडे आणि महेश माकडे हे होते .यावेळी इयत्ता 10 वी मध्ये प्रथम आलेला वेदांत गजानन धांडे 12 वीत प्रथम आलेला साकेत राजेंद्र अलई व हेमंत नंदकुमार मराठे ,ऋतुजा दिलीप येवले,अथर्व विजय येवले या गुणवंतांचा प्रमुख सत्कार कार्यक्रमाचे आकर्षण ठरला,याप्रसंगी बालवाडी ते पदवीधर सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले,कार्यक्रमा दरम्यान सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या, दर तासाला लकी ड्रॉ व प्रश्न मंजुषा यामुळे बक्षिसांची लयलुट करण्यात आली..तसेच समाज विकासाच्या कार्याला उदारमताने दातृत्व दाखविणारे संजय शिरोडे,राकेश येवले ,विजय कुडे, विकास ब्राम्हणकार, अंकिता नेरकर , तसेच जी एस हायस्कूल चे चेअरमन हरी भिका वाणी, कृ ऊ बा समितीचे संचालक प्रकाश अमृतकार, विजय चिंचोले (धुळे) जितेंद्र शेवाळकर (पारोळा) निलेश वाणी (चाळीसगाव)अनिल मालपुरे (पारोळा)अनिल अमृतकार, जितेंद्र पाखले,प्रविण गोसावी,सुभाष नेरकर,गणेश वाणी,कन्हैया साडी सेटंर,महेन्द्र बोरसे,पंकज पाटील,या मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला सर्व समाज बांधव व माता भगिनी व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रकाश मेखा यांनी केले तर समाजातील सर्व शिक्षक वृदांचे विषेश सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त ला. वा. पंच मंडळ यांनी परीश्रम घेतले .