जी.एम.सोनार नगरात उसळली भक्तांची गर्दी……
अमळनेर : गजानन महाराज भक्तासाठी मोठा सोहळा असतो.यानिमित्ताने अमळनेर येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथे संत गजानन महाराज मंदिरातील महीला वारी शेंगावला निघत असतांना सकाळी महा आरती चा लाभ अनेक महाभक्त व वारीतील महीला भगिनी यांनी घेतला.यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील भाविकांची अलोट गर्दी उसळली तर हजारो भक्तांनी गजानन महाराज चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
अमळनेर येथील शहरासह ग्रामीण भागातील गजानन महाराज भक्तांची गेल्या पाच वर्षासून अमळनेर ते शेगाव पायी वारी जाते. यावर्षीही सुमारे दोनशे भाविकाची पायी वारी अमळनेर येथील दादासाहेब जी एम सोनार नगर येथून आज दि.27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी सकाळी सात वाजता प्रस्थान झाली असून ता 4 जानेवारी गुरुवारी 2024 रोजी शेगाव पोहचणार आहे.
यावेळी पहाटे साडे पाच वाजता गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. महाआरती श्रीराम मुळे (कँशीयर पंजाब बँक अमळनेर) व सौ अर्पना मुळे यांच्या हस्ते करण्यात आली..
अशोक भावे महाराज, नितीन भावे,गजानन महाराज मंदिराचे वारी प्रमुख सेवानिवृत प्रा. आर बी पवार,महीला वारी प्रमुख सौ ज्योती पवार, सेवेकरी रघुनाथ पाटील,विश्वास पाटील,जाधव व बंधू व भगिनी उपस्थित होते. सकाळी दत्त मंदिर विद्याविहार कॉलनी येथे जयवंतराव पाटील व त्यांचे सर्व मित्र परिवार यांनी सर्व वारीतील महिला बंधू-भगिनींना नास्ताची व्यवस्था केली.
महिला पायी वारीचे हे पाचवे वर्ष आहे यावेळी अमळनेर तालुक्यातील, पारोळा तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काही भाविक पायी वारीला रात्री मंदिरात मुक्कामी होते.
सकाळी सात वाजता बँडच्या वाद्यात भजनाच्या ताला सुरात शहरातून वाजत गाजत पायी वारी निघाली. याप्रसंगी चौकात चौकात पालखीची पुजा करीत दारापुढे रांगोळी काढीत स्वागत करण्यात आले. ता.27 डिसेंबर ते ता. 4 जानेवारी 2024 दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, भक्त यांच्या सहकार्याने पायी वारीत भक्तना चहा, जेवण व मुक्कामाची सोय केली आहे.
यावेळी डांगरी, सात्री, मारवड, कळमसरे, पातोंडा, अंमळगाव,पिंगळवाडे सुमठाणे,तामसवाडी, खापरखेडा, मुसळी मुंबई कंकराज भिलाली रडावण राजोरे,
,यांच्यासह अमळनेर शहरातील सुमारे दोनशे भाविक यावेळी पायीवारीत सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून पायी वारी साठी नियोजन महीला वारी प्रमुख सौ ज्योती पवार, प्रिया उपासनी,कल्याणी भावे,नितल पाटील, चारूलता पाटील (कल्याण) राजश्री नेरकर, मंगला भिल सात्री,सुरेखा चौधरी मारवड, विनाधारी सरला चौधरी, तुळसीधारी पुजा पाटील,
आशा पाटील करणखेडा,शारदा भदाणे,शोभा चौधरी अमळगाव,गोपीमाई,
बाळू पाटील,भैय्या साळुंखे, विलास पाटील सबगव्हाण, योगेश पाटील, एम.एस.पाटील, जिजाबराव पाटील, प्रविण पवार, सह भाविक उपस्थित होते.