विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीतर्फे “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या अभियानाची सुरुवात

अमळनेर: अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन करून “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या अभियानाची सुरुवात करण्यात आली तर पहिल्याच दिवशी मारवड येथे ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद विद्रोहीच्या मोहिमेस दिला.
अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २४ ला होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ या सानेगुरुजी यांच्या मानवतावादी संदेश समर्पित आहे. म्हणून विद्रोही संमेलनात सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकांनाही सहभाग देता यावा या उद्देशाने “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या पुतळ्यास विद्रोही साहित्य संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून केले.यावेळी जयवंतराव पाटील,प्रा.अशोक पवार, जयवंत भिमराव पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील,मुन्ना शर्मा, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.डॉ.लिलाधर पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, दयाराम पाटील,प्रा,डॉ.राहुल निकम, मराठा सेवा संघ अध्यक्ष रामेश्वर भदाणे, आर बी पाटील, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, डी ए सोनवणे, प्रसाद शर्मा, योगेश पाटील, आनंदा पाटील, अजिंक्य चिखलोदकर, शुभम पवार,अशोक सुतार, रविंद्र सुकदेव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दानपेटी मध्ये माझी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा सामाजिक कार्यकर्ते सोमचंद संदानशिव, डी एम पाटील यांनी दानपेटीत आर्थिक मदत देत उपस्थिती दिली.
मारवड ग्रामस्थांच्या वतीने भरभरून मदत
पहिल्याच दिवशी मारवाड येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समिती मारवड येथे पोहोचली असता गावकऱ्यांनी “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोहीसाठी” या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभाग घेत विद्रोहीच्या दानपेटीत भरभरून आर्थिक मदत व दोन पोते धान्य भेट दिली.विद्रोही ची गाडी व दानपेटी घेवून यावेळी माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील,मराठ समाज अध्यक्ष जयवंतआबा पाटील, हरिभाऊ मारवडकर, जयवंत पाटील, वसंत कन्हेरेकर ,भूषण भदाणे, युवा कार्यकर्ते तुषार संदानशिव, अजिंक्य चिखलोदकर, आदिंसह कार्यकर्ते गावात फेरी काढून माहिती पत्रक वाटत होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी दानपेटीत आर्थिक मदत देत उपस्थिती दिली तर गणेश साळूखे, अतुल साळुंखे, दिलीप चव्हाण, सचिन साळुंखे, शामकांत पाटील, चंद्रकांत साळुंखे आदिंसह मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी मोहिमेत सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]