

प्रतिनिधी…..
चाळीसगाव दूध उत्पादक शेतकर्यांना दूधाचा योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्यात शासनाविषयी अंसतोष निर्माण झाला आहे. दूध उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने कमी भावात दूध विकणे शेतकर्यांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. यातून शेतकर्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने दूध उत्पादक शेतकर्यांनी तहसिल कार्यालया समोर दूध ओतून आंदेालन करत शासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. दूध दरवाढीबाबतचे निवेदन तहसिलदार श्री.प्रशांत पाटील यांना निवेदन यावेळी देण्यात आले.जळगांव दूध संघाच्या वतीने गाईच्या दूधाला ३६ रूपये प्रति लिटर दूधाला भाव मिळत असतांना दूध संघाने आता तो एकदम ७ रूपयांनी कमी करत २९ रूपये केला आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेंतकर्यांनी दूध संघाच्या निर्णया विरोधात तीव्र भावना व्यक्त करत दूध संघाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.राज्य शासनाने प्रति लिटर ३४.१० रूपये दर निर्धारित केला असतांना सुध्दा दूध संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांच्या दूधाला त्याप्रमाणे भाव मिळत नसल्याची खंत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.तुषार निकम यांनी यावेळी व्यक्त केली. दूध संघाने महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी दरात दूध न घेता ठरविलेल्या दरा प्रमाणे दूधाला भाव द्यावा. अन्यथा शासन व दूध संघाच्या विरोधात दि.१७ डिसेंबर २०२३ रेाजी खरजई चौफुली, चाळीसगाव येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशाराही तुषार निकम यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच दूध संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांना यंदा प्रथमच दूध दिवाळी बोनस न मिळाल्याचे समाधान पाटील या शेतकर्याने यावेळी सांगितले. जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी देखील दूध संघाच्या निर्णयाचा विरोध करत दूध उत्पादक शेतकर्यांना दुष्काळी परिस्थिती असतांना शासनाने ठरवून दिलेला दर दिला पाहिजे असे स्पष्ट सांगितले.शेतकरी भूषण पाटील यांनी देखील महाराष्ट्र शासनाच्या धोरणांवर कठोर शब्दांत टिका केली. चंद्रकांत ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना हमी भाव मिळत असतांना दुध संघाने दूधाला देखील आता हमी भाव मिळाला पाहिजे. तसे होत नाही तोपर्यंत शेतकर्यांना आर्थिक खाईत लोटले जात आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनोहर साहेबराव पाटील, सुनील पाटील, प्रशांत दिलीप भदाणे,
योगेश रघुनाथ पाटील, प्रदीप मराठे, विनोद भाऊसाहेब पाटील ,भूषण नंदनसिंग परदेशी ,चंद्रकांत वसंतराव ठाकरे ,भूषण वसंतराव पाटील, योगेश त्र्यंबक पाटील,
चेतन भाऊसाहेब पाटील, अतुल शेषराव पाटील, मयूर विलास पाटील, सागर बारकू पाटील, प्रमोद रावसाहेब पाटील,भाऊसाहेब आधार पाटील ,महेंद्र निकम सर समाधान पाटील आदी उपस्थित होते.