
महत्वपूर्ण रस्ते कामांचा समावेश

अमळनेर: तालुक्यातील मौजे पाडसे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी कामगार नेते एल.टी.पाटील, सरपंच प्रतिभा चिंतामण पाटील, उपसरपंच रामकृष्ण भगवान कोळी, ग्रामपंचायत सदस्य दाजीबा गव्हाणे, वंदना बाळकृष्ण खैरनार, युवराज पारधी यांच्या सह निंबा पाटील, राजेंद्र पाटील, मुक्तेश्वर कोळी, विश्वास कोळी, विठ्ठल पाटील, दत्तु पाटील, काशीनाथ पाटील, महेंद्र पाटील, विकास पाटील, विनोद पाटील, सतिष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील शांताराम पाटील, मंगलाबाई पाटील,भटाबाई पाटील, यमुनाबाई पाटील, विमलबाई पाटील, कल्पना पाटील, सखुबाई पाटील, पुष्पाबाई सनेर, संगीता पाटील आदी उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
2515 जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे रक्कम 10 लक्ष, सामाजिक न्याय अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे रक्कम 15 लक्ष या दोन्ही कामांचे भूमिपूजन व
2515 अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे रक्कम 10 लक्ष या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
