अमळनेर नगरपरिषद दिव्यांग निधी अपव्यय प्रकरण
अमळनेर: सन २०१९-२० मधील अमळनेर नगरपरिषद दिव्यांग ५% निधी वाटपात तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी 6 अपात्र व्यक्तींना बेकायदेशीर लाभ दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या परंतु कुठलीही ठोस कारवाई झाली नव्हती शेवटी योगेश पवार यांनी सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण, पुणे येथे याचिका दाखल केली होती. जो प्रकार झाला तो दिव्यांगांवर अन्यायकारक आहे, व प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यानुसार सुनावणी दि.०५/१२/२०२३ रोजी सुनावणी होऊन, प्रशासकीय चूक कोणाकडून झाली, निधी वाटपाचा निर्णय कोणी घेतला, निधी परत घेण्याचा निर्णय कश्याप्रकारे घेण्यात आला. त्याबाबत अमळनेर नगरपरिषदेने सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना पुरवावीत व जिल्हाधिकारी जळगांव यांनी चौकशी करून, दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ कलम ८९ व ९५ बरोबरच प्रशासकीय कारवाई करावी आणि पुराव्यांचे आधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जळगांव यांना देण्यात यावे आणि तसा संपूर्ण अहवाल ३ महिन्यात दिव्यांग न्यायालयात पाठवावे असे निर्देश देत योगेश पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे.