अमळनेर – तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ३७१ हेक्टर क्षेत्राला अवकाळी’चा मार बसला आहे. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा ३७१ हेक्टर क्षेत्रात मार बसला आहे. ७३ गावांमधील ६७० शेतकरी बाधीत झाले असून या
आठवड्यात तिसऱ्यांदा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त
गावांमध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात पावसाचा फटका बसला आहे. तसेच अनेक तालुक्यातील ६७० शेतकऱ्यांचे नुकसान
झाले आहे. पावसासोबतच ३५ ते ४० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, कापूस व हरभरा तसेच इतर फळपिकांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे.