बाजारपेठ व न्यू प्लॉट परिसरातील रस्त्यांचे उजळले भाग्य,ना. पाटील यांचे हस्ते झाले थाटात भूमीपूजन
अमळनेर: मोठ्या शहरात ज्याप्रमाणे एका रंगाचे पथदिवे लावून शहराची वेगळी ओळख निर्माण केली जाते त्याचप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व प्रमुख चौक वेगळ्या खांबाद्वारे एकाच रंगाच्या पथदिव्यांनी सजवून वेगळी ओळख निर्माण करण्यासह चौक सुशोभित करण्याचा मानस राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला.
अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठ व न्यू प्लॉट परिसरात नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा दि 26 रोजी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. सुरवातीला लालबाग ते बोहरी पंप या रस्त्याचे व्हाईट बिल्डिंग शाळेजवळ पहिले भूमिपूजन झाले, त्यानंतर लागलीच पोस्ट ऑफिस जवळ मंगलमूर्ती ते पोस्ट ऑफिस आणि सेवा स्टाईल ते स्टेट बँक या दोन रस्त्यांचे भूमिपूजन झाले, पुढे सचदेव जनरल जवळ सचदेव ते पाचपावली रस्त्याचे भूमिपूजन होऊन शेवटी सुभाष चौकात सुभाष चौक ते तिरंगा चौक रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.यावेळी नागरिकांनी मंत्री अनिल पाटील यांचे प्रत्येक चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांचा गजर करत बुके देऊन स्वागत केले,आणि जाहीर आभारही व्यक्त केले.न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि व्यापारी बांधव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी या भागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरण करून सर्व प्रमुख रस्त्यांना निधी मंजुर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.तर मंत्री अनिल पाटील यांनी इतर राहिलेले रस्ते देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील अशी ग्वाही दिली.यावेळी महावीर पतपेढी चे संचालक प्रकाशचंद्र पारेख, खा. शि. मंडळाचे संचालक निरज अग्रवाल,माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,डॉ संजय शाह,मकसूदभाई बोहरी,एहसान भाई बोहरी, अलिहुसेन बोहरी, अजिज बोहरी, हुसेन बोहरी,अहमदी बोहरी, शब्बीर तज्मुल हुसेन, जुवेब नज्मुल, अब्दुल कादीर, अबुभाई बुकवाला, शैफुद्दीन हुसेन,सामाजिक कार्यकर्ते पंकज साळी,ऍड विवेक लाठी, सुनिल सेठ,राजेंद्र सेठ,प्रसाद शर्मा,मिलिंद भामरे,प्रविण पारेख, विजय कटारिया, विजय माहेश्वरी, राकेश माहेश्वरी,आकाश माहेश्वरी, प्रा.सुरेश पाटील, मुख्तार खाटीक, अशोक हिंदुजा, किरण पाटील,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,विवेक पाटील,लिओ क्लब अध्यक्ष प्रणित झाबक,सोमचंद संदानशिव दत्ता कासार, देवदत्त संदानशिव, भगवान पाटील, नितीन निळे, डॉ.किरण शहा,भरत सैनानी,देविदास देसले, इम्रान खाटीक, अनिल रायसोनी, दिलीप शाह,जयसिंग परदेशी,अतुल राजपूत, आबा माळी, खेमचंद कटारिया,विवेक लाठी,प्रेम शाह,संतोष पाटील,तेजु जामखेडकर,विजय जोशी,रघुनाथ पाटील,संजय शर्मा,केयुर ठक्कर,निशांत गांधी,छोटू पाटील,डॉ किरण शाह,चेतन परदेशी,चंद्रकांत महाजन,कैलास नागदेव, संदेश परदेशी, नरेंद्र भामरे,बिपिन पाटील,ओमप्रकाश लाठी, महेंद्र पाटील,प्रितेश जैन,अनिल सचदेव ,घनश्याम थदाणी, कैलास नागदेव,राजू सणस, दीपक पाटील,सचिन पारेख,पप्पू जैन, न.पा. इंजिनियर अमोल भामरे व त्यांचे सहकारी मिलींद चौधरी, अविनाश संदानशिव, सोमचंद संदानशिव त्याचप्रमाणे महेश राजपूत, जयदीप राजपूत,मयूर भावसार राजेंद्र देशमुख, संजय पाटील, संजय कौतिक पाटील, योगेश पाटील, हेमंत पाटील, गोविंदा बाविस्कर, रविंद्र यादव,निलेश लांडगे,धनराज महाजन,शैलेश पाटील,प्रदीप कंखरे,ज्ञानेश्वर पाटील,सुरज सराफ,भागवत माळी, हृदयनाथ मोरे, आदि कार्यकर्ते तसेच सर्व व्यापारी बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, बोहरी समाज बांधव,तरुण मंडळी,भाजी विक्रेते,लघु व्यावसायिक व नागरिकांनी यावेळी उपस्थिती दिली.