अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवारी, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी शोभायात्रा व वृक्षदिंडी तसेच २६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या वर राजा भगवान श्री विष्णूजी व वधू राणी श्री तुलसीदेवी यांच्या विवाह महासोहळ्यास अनेकांचे सहकार्य लाभले. अनेक दात्यांनी शोभायात्रेदरम्यान फळे, फ्रूट ज्यूस मिठाई व फरसाण वाटप केले.
यात लायन्स व रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे ज्यूस, बिस्कीट, चॉकलेट व मिठाई, विजय शॉपीचे संचालक मोहनलालजी जैन व विजय माहेश्वरी यांच्याकडून केळी व फरसाण, पी. एन. ज्वेलर्सचे संचालक पंकज दुसाने यांच्यातर्फे चहापान, दुर्गा मेडिकलचे लक्ष्मण पंजाबी यांच्यातर्फे बिस्कीट व भरत ललवाणी यांच्यातर्फे केळी, वेफर्स ,अशोक माधवानी यांच्यातर्फे सोहन पापडी ,महावीर आईस्क्रीमचे प्रकाश जैन यांनी बिस्कीट व पाणी, आशू नॉव्हेल्टीजचे संचालक विशाल शर्मा यांच्यातर्फे बिस्कीट व फरसाण, आशिष अलंकारचे संचालक राजेंद्र वर्मा यांच्याकडून चॉकलेट, सराफ बाजारातील विनोद वर्मा, मनीष जोशी, पंकज चौधरी यांच्याकडून पाणी वाटप करण्यात आले. सराफ बाजारातील खुशी अलंकारच्या मनीषा शेंडे यांनी वृक्षदिंडीदरम्यान तुळशीची रोपे उपलब्ध करून दिली. नाशिक येथील गुलालवाडी ढोलपथकाने चित्तथरारक कसरतींद्वारे भाविकांची मने जिंकली, तर मुंबई येथील निशा मोकल यांच्या महिला वाद्यवृंदाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शोभायात्रेदरम्यान घोडेस्वार म्हणून अमळनेर येथील माहेरवासी व हल्ली मुंबईत वास्तव्यास असलेल्या वर्षा विसपुते-सोनवणे तसेच नीलाक्षी महेश बागूल या विशेष लक्षवेधी ठरल्या. शोभायात्रेत सहभागी मंदिराच्या सेवेकऱ्यांचे गणवेशही विशेष आकर्षण ठरले. हळद व मेहंदीच्या कार्यक्रमात शहरातील जवळपास सर्वच महिला मंडळांची मोठी उपस्थिती होती. यावेळी शिक्षक एस.एच.कागणे यांच्या म्युझिकल ग्रूप व निवेदिकेने खूपच धमाल उडविली.
याप्रसगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त, अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे यांनी शोभायात्रा, वृक्षदिंडीसह श्री तुळशी विवाह महासोहळ्यावेळी विविध मान्यवरांचे स्वागत केले.
मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, आर. टी. पाटील, श्रीमती उज्ज्वला शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतीक जैन, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी, विनोद अग्रवाल, जी. एस. चौधरी, उमाकांत हिरे, एम. जी. पाटील, जे. व्ही. बाविस्कर, व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. डी. भदाणे, डी. ए. सोनवणे, विनोद कदम, पुषंद ढाके, आशिष चौधरी, राहुल पाटील, बाळा पवार, डॉ. मिलिंद पाटील, निलेश महाजन, सुनील गोसावी, सुनीता कुलकर्णी, आशा महाले, आनंद महाले, स्वाती महाले, मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.