स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या चतुर्थ स्मृती दिनी अमळनेरात अनेकांकडून आदरांजली अर्पण

अमळनेर: ‘सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील’,’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बापू आठवण तुमची येत राहील’,,,या शब्दात भाजपाचे दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या चतुर्थ स्मृती दिनी अमळनेरात अनेकांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली.
उदय बापूंना आदरांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने काल दि 28 रोजी सकाळपासूनच त्यांच्या अमळनेर बाजार समिती समोरील स्मारकस्थळी हितचिंतक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.यावेळी अनेकांनी बापूंच्या प्रतिमेस फुले वाहत त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.अनेकांनी असवांजली देखील अर्पण केली यावेळी वाघ कुटुंबीय भाजपाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,सर्व पक्षीय पदाधिकारी मान्यवर,पत्रकार व बापूंच्या प्रेमींच्या उपस्थितीत शोकसभा होऊन सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सारेच जण दुपारपर्यंत स्मारकस्थळी थांबून होते,आदरांजली अर्पण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत येणाऱ्यांची गर्दी सुरू होती.दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत असलेल्या स्वर्गीय उदय बापूंनी सामान्य शेतकरी कुटुंबातील असताना स्वकर्तृत्वावर मोठे नावलौकिक मिळविले होते,राजकीय जीवनात डांगर बु या छोट्याशा गावातून सुरुवात करत जिल्हा व प्रदेश पातळीपर्यंत गरुड झेप घेतली होती,माजी आमदार स्मिता वाघांसारख्या कर्तृत्ववान व खंबीर साथी धर्मपत्नी च्या रूपाने त्यांना लाभल्याने त्यांचा राजकीय रथ अधिकच वेगवान झाला,बापू म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारे व्यासपीठ होते,यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक गावात,प्रत्येक तालुक्यात आणि जिल्हास्तरावर देखील त्यांनी कार्यकर्ते घडविले आज बापूंच्या तालमीत घडविले गेलेले तेच कार्यकर्ते भाजपाचा रथ ओढत आहेत.मात्र त्यांचे लाडके बापू चार वर्षांपूर्वी अचानक त्यांना सोडून गेल्याने शेकडो कार्यकर्ते आजही त्यांच्या आठवणीने व्याकुळ असतात.आणि म्हणूनच त्यांची आठवण म्हणून स्मृती दिनी त्यांच्या स्मारकस्थळी ते आवर्जून हजेरी लावत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *