देवगाव देवळी हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा….

दहावीचे विद्यार्थी बनले शिक्षक…

अमळनेर : महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत…क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर येथे 28 नोव्हेंबर हा महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला..
शिक्षकाची भूमिका इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी मुख्याध्यापक पासून ते शिपायाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे केली. त्यात दहावीची मुख्याध्यापकाची भूमिका श्वेता बैसाणे (इंग्रजी),जयश्री पाटील (मराठी),वैष्णवी माळी (हिंदी,)भाग्यश्री पाटील (विज्ञान)गायत्री भिल (गणित),धनश्री वैराळे (इतिहास)
आकांक्षा जाधव (भूगोल),भावेश माळी (भूगोल),शिपाई नितेश वसावे भूमिका केल्या.
नंतरच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले व महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. विचारपिठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व विद्यार्थी शिक्षक व शाळेचे शिक्षक आय.आर महाजन, एस के महाजन ,अरविंद सोनटक्के ,एच,ओ.माळी, शाळेचे भाऊसाहेब एन जी देशमुख
उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या व महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त यांच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]