पत्रकाराला समाजाची आई होता आली पाहिजे.
जयदिप पाटील यांचे प्रतिपादन

दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान…

अमळनेर : अमळनेरात पत्रकार बांधवांची संख्या खूप आहे..साने गुरुजींच्या विचाराने कृतीशील भूमीत चांगल्या विचाराची पेरणी झालेली आहे..लक्ष्मी पूजनाच्या पवित्र दिवशी मराठी लाईव्ह न्यूज चा 4 था वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय, पर्यावरण, उदयोग, अध्यात्म, विज्ञान, दिव्यांग, युवा अशा क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा ‘सन्मान कर्तृत्वाचा ‘हया नावाने पुरस्कार देण्यात आले. सदर कार्यक्रम हा अगदी ब्रिटीश काळात निर्माण झालेल्या साने गुरूजी वाचनालयात झाला. याप्रसंगी विचारमंचावर मा. कपिल पवार उपसंचालक, नागपूर महानगर विकास प्राधीकरण, सुनिल नंदवाडकर उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. डाॅ. जयदीप पाटील डाॅ. एस. आर. चौधरी,व्हाईस मिडीया चे जिल्हाध्यक्ष, मंगळ ग्रह संस्था अध्यक्ष, पत्रकार डिगंबर महाले,साने गुरूजी वाचनालय संचालक प्रकाश वाघ ,राजेंद्र खैरनार वित्त लेखाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. जयदिप पाटील बोलत होते. मराठी लाईव्ह न्यूज विचारमंचावरून बोलतांना ते म्हणाले पत्रकाराला हा समाजाची आई होता आले पाहिजे. अमळनेरचे नाव सर्वच चांगल्या कामासाठी प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे पत्रकार म्हणूनही चांगले नाव आहे. पत्रकार जर शिक्षक असेल तर उत्तमच! महात्मा फुले,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते. ब्रिटीश काळात पत्रकाराचे खूप योगदान होते. पत्रकाराच्या लेखामुळे चांगली चळवळ उभी केली. विषाला अमृत करण्याची ताकद पत्रकारात असते. ब्रिटीशांनी विद्रोही पत्रकारावर कारवाई केली. पत्रकाराचे शब्द महत्वाचे आहे. शब्दच करतात क्रांती अन शब्दच जोडतात माणसे..शब्दाने पत्रकार समाजाचा ठाव घेतात. शब्द असतात अनमोल! काळानुसार पत्रकाराने बदल केला पाहिजे. डिजीटल युग आहे त्यामुळे अदयावत होणे गरजेचे आहे. ज्याला काळाची पाऊले होता येते त्यालाच जग जिंकता येते. जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रभाव वाढत आहे. पत्रकाराने चांगुलपणा जपला पाहिजे. जगण्यातील ऊर्जा व झपाटलेपण हरविता कामा नये. स्वत:च्या जीवनातील चैतन्य शोधले पाहिजे. चेहरा फिरवायला कर्तृत्व लागते. आपल्या सुंदर विचारातून डाॅ. जयदिप पाटील यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुरूवातीला मराठी लाईव्ह न्यूज चे संपादक ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून हा अप्रतिम कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमातील मनोगतात माजी प्राचार्य एस.आर. चौधरी, विलास पाटील संस्थाचालक, कपिल पवार,सुनिल नंदवाडकर पोलीस अधिकारी यांनी विचार मांडले. पुरस्कार प्राप्त मनोगतात मा.मुख्याध्यापक सतिष देशमुख, विजय पवार सर यांनी विचार मांडले. माजी आमदार शिरीषदादा यांनी आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ देत कायम मराठी लाईव्ह न्यूज च्या पाठीशी उभे असल्याचे शेवटच्या मनोगतात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी आपल्या सुरेल आवाजात केले.

यांचा झाला सन्मान

प्रा. जयदीप पाटील विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य,साने गुरुजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.डी देशमुख व सौ अनिता देशमुख आदर्श माता पुरस्कार,प्रा.आर.बी.पवार व सौ ज्योती पवार अध्यात्मिक क्षेत्र,विक्रांत पाटील व स्वप्ना पाटील सामाजिक व राजकीय क्षेत्र,पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर,डॉ योगेश रघुनाथ महाजन दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य, अश्विन लिलाचंद पाटील पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य,गणेश भामरे युवा प्रेरणा पुरस्कार,भिकेश पावबा पाटील सामाजिक क्षेत्र, मोन्टी उर्फ अक्षय साळी युवा उदयोजक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शिल्ड,शाल,बुके देऊन सन्मानित करण्यात आले…
यावेळी कार्यक्रमात चार विशेष सत्कार करण्यात आले. व्हाईस मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले डिगंबर महाले,काग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख विलासराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल व अर्बन बँकेच्या निवडणुकीत सौ वसुंधरा दशरथ लांडगे या प्रंचड मताने निवडून आल्याबद्दल व डॉ उदय पाटील व वडीलांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते शाल बुके देऊन गौरविण्यात आले..
यावेळी शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, राजकीय, साहित्य, धार्मिक क्षेत्रातील बांधव व भगिनी मोठ्या पसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार ईश्वर महाजन ,सोपान भवरे व सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक मंडळ, कर्मचारी वृद यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]